Ad will apear here
Next
‘पीएनजी’तर्फे अक्षय्य तृतीयेसाठी विशेष कलेक्शन
पुणे : सोन्याला आपल्याकडे समृद्धी म्हणून समजले जाते आणि साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया ही सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम समजण्यात येते. त्यामुळेच अक्षय्य तृतीया व आगामी लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने दाक्षिणात्य शैलीवर आधारित दागिन्यांचे विशेष कलेक्शन बाजारात आणले आहे. यामध्ये कर्णफुले, पेडंट्स, झुमके, बांगड्या तसेच विविध प्रकारचे नेकलेस आहेत.

याबाबत ‘पु. ना.’चे अध्यक्ष अजित गाडगीळ म्हणाले, ‘नवे कलेक्शन हाताने घडविण्यात आले असून, यामध्ये विविध रंगांचे पैलू पाडलेले खडे व मोत्यांचा वापर केला आहे. दागिन्यांची शैली ही दाक्षिणात्य दागिन्यांच्या शैलीवर आधारित आहे. हे दागिने लग्नसमारंभ व विशेष समारंभांसाठी नक्कीच योग्य असे आहेत.’

‘ग्राहकांना सतत नवीन काही देण्याचा आमचा प्रयत्न असतो. यापूर्वी सादर केलेल्या उत्सव विविधतेचा, फेस्टिव्हल ऑफ डायमंड्स, लँटर्न कलेक्शनला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आता हे कलेक्शन आमच्या सर्व पंचवीस दालनांत पुणे (सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी (कोथरूड), सिंहगड रोड, चिंचवड व भोसरी), तर अमरावती, बीड, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, पंढरपूर, सोलापूर, सातारा, संगमनेर, शिरूर, धुळे, कलबुर्गी (कर्नाटक), प्रभादेवी-मुंबई, वडोदरा (गुजरात), जळगाव, वर्धा, परभणी व उस्मनाबाद येथे उपलब्ध आहे,’ असे ‘पु. ना.’चे संचालक व सीईओ अमित मोडक यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZVXBN
Similar Posts
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे अक्षय्य तृतीयेसाठी विशेष कलेक्शन पुणे : सोन्याला आपल्याकडे समृद्धी समजले जाते आणि साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया ही सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम समजण्यात येते. त्यामुळेच अक्षय्य तृतीया व आगामी लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने दाक्षिणात्य शैलीवर आधारित दागिन्यांचे विशेष कलेक्शन बाजारात आणले आहे
चढ्या दराचे सोनेखरेदीवर सावट पुणे : ‘गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याला आपल्याकडे प्राधान्य दिले जाते. यात व्यावहारिक दृष्टिकोनापेक्षा परंपरेचा पगडा अधिक आहे. त्यामुळे सोनेखरेदीसाठी शुभमुहूर्तालाही विशेष महत्त्व असते. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशीही आवर्जून सोनेखरेदी केली जाते
दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलत पुणे : दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के मजुरी माफ असल्यास दागिने खरेदीचा आनंद नक्कीच द्विगुणीत होतो. त्यामुळेच पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने सोने-चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलतीची ‘अँड १००%’ योजना सुरू केली आहे. कंपनीच्या सर्व दालनांमध्ये ही योजना उपलब्ध आहे.
पु. ना. गाडगीळ आणि सन्स आता उस्मानाबादमध्ये उस्मानाबाद : तब्बल १८६ वर्षांची परंपरा असलेल्या आणि सोने-चांदी व हिरे दागिन्यांच्या व्यवसायातील देशातील आघाडीचा व विश्वासार्ह ब्रँड पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडच्या उस्मानाबादमधील दालनाचे उद्घाटन रंगनाथ कुलकर्णी, शैलेंद्र धुरगुडे व शालिनीताई ओक यांच्या हस्ते बुधवारी झाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language